श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूज यांच्या वतीने अकलूज मध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सहात साजरी…
अकलूज (प्रतिनिधी )
17 मार्च (फाल्गुन वद्य तृतीया) पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती .श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूज विभागाकडून गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार दरवर्षी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात येत असते. गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी आयुष्यभर शिवशंभु यांच्या विचारांवर,मार्गदर्शनावर चालणारी पीडी निर्माण केली आहे.शिवशंभूंच्या विचारांचं बाळकडू पाजून ही अखंड धारकरी वर्ग सदैव देव,देश,धर्मा साठी कार्य करणारा घडावा. म्हणून गुरुजींनी आपली अक्खी हयात खर्ची घातली आहे.
शिवजयंती निमित्त सोलापूर जिल्हा सरचिटणीस मा.श्री.सचिनजी शिंदे सर यांनी प्रतिमीचे पूजन करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणामंत्र व ध्येय मंत्राने करण्यात आली .हा सण एका दिवसापुरता मर्यादित नसून वर्षाचे 365 दिवस शिवजयंती साजरी करणारी एकमेव संघटना म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानअसे सुधीर पवार यांनी सांगितले.
यावेळी प्रतिष्ठान चे तालुका. प्रमुख गणेश इंगळे, श्री शिवाजीराव घोडके,श्री. सुधीर पवार, श्री वैभव टोंगळे श्री हर्षवर्धन भूतनाळ,श्री राहुल माने,दीपराज माने देशमुख,श्री गणेश जाधव,तेजस माने,वैभव वडतिले, सागर कापसे,अक्षय चौगुले,प्रवीण रोडे,सिद्धेश्वर सूर्यवंशी, राजाभाऊ शिंदे आदी धर्मबंधू व धारकरी वर्ग उपस्थित होते..
….यावेळी सुधीर पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले व हिंदू धर्म कार्यासाठी असंच संघटितपणे देव देश धर्मासाठी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे असं सांगितलं…..






