लोकशाहीचा चौथा स्तंभ निरोगी व मानसिक द्रुष्ट्या कणखर आसावा -डॉ एम के इनामदार
माळशिरस/ प्रतिनीधी – रणजितदादा गायकवाड
पर्यावरण , प्रदूषण , वाढती महागाई , आरोग्य या सारख्या संकटाना माणसाला सामोरे जावे लागत आहे . कोणताही वैद्यकीय उपचार आता न परवडणारा झाला आहे .
या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आरोग्य विमा ही काळाची गरज असून नागरिकांनी तो काढावा असे आवाहन प्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ एम के इनामदार यांनी केले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ शारीरिक व मानसिक द्रुष्ट्या कणखर व निरोगी असावे यासाठीअकलूज येथील डॉ एम के इनामदार यांच्या अश्विनी रुग्णालयात सालाबादप्रमाणे यंदाही माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली .
त्याप्रसंगी आयोजित समारंभात डॉ एम के इनामदार यांनी आरोग्य विषयक माहिती दिली ..डॉ इनामदार म्हणाले , आजही लोक दवाखान्याची पायरी चढायला नको म्हणतात त्याचे एकमेव कारण म्हणजे वैद्यकीय उपचार महागडे झाले आहेत . औषध , गोळ्या , वैद्यकीय साहित्य महागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारे झाले आहे . त्यामुळे माणूस वैद्यकीय उपचारापासून दूर जात आहे . या सर्वांवर एकच उपाय म्हणजे आरोग्य विमा . केंद्र सरकारने यामध्ये अनेक सुविधा दिल्या आहेत . त्याचा फायदा नागरिकांनी घ्यावा असे ते म्हणाले.
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने डॉ एम के इनामदार व डॉ अनिकेत इनामदार यांचा किरण जाधव व सूर्यकांत भिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
प्रास्ताविक पत्रकार रामभाऊ मगर यांनी केले तर आभार चंद्रकांत कुंभार यांनी मानले . माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी तालुक्यातील 50 पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .






