बालाजी फाउंडेशन देडगाव जीवन सहारा परिवार व अष्टविनायक मंडळ संग्राम नगर व संगम नगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण.वाढते प्रदूषण यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे: मेजर शिवाजी पठाडे
अकलूज (रणजितदादा गायकवाड )बालाजी फाउंडेशन देडगावं, जीवन सहार परिवार व अष्टविनायक मंडळ,संग्रामनगर व संगमनगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने संग्राम नगर ग्रामपंचायत हद्दीतील गुरुमाऊली ते महादेव मंदिर संग्रामनगर या ठिकाणी रविवार दिनांक ०९/०२/२५ रोजी वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये वड, पिंपळ,भेंडी अश्या ऑक्सीजन देणाऱ्या मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
काळाची गरज व वाढते प्रदूषण याला आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वृक्षारोपण का गरजेचे आहे याविषयी उपस्थित लोकांना महत्त्व पटवून देण्यात आले येणाऱ्या काळामध्ये आणखी वृक्षारोपण संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे .सदर कार्यक्रमासाठी जीवन सहारा परिवार चे अध्यक्ष सागर फडे व सर्व सदस्यांनी श्रमदान करून वृक्षारोपण केले
. बालाजी फाउंडेशनचे मेजर शिवाजी पठाडे यांनी मोलाचे सहकार्य केले .यावेळी संग्रामनगर गुमास्ता कॉलनी येथील ग्रामपंचायत सदस्य बापू वैद्य,सुदेश रासकर,अमित दोशी ,मयूर फडे,गौरव फडे,योगेश गांधी ,सत्यजित दोशी, सतीश दोशी, पियुष दोशी,तसेच मंडळाचे रोहित पिंपरकर,विजय देवळे,राहुल नागणे,प्रफुल्ल काटकर,महेश म्हेत्रे, पारस खडके,सुजित बामणकर,तेजस उपाध्ये,यश शिरढोणे,सचिन बोरावके यांनी वृक्षारोपणसाठी परिश्रम घेतले.













या उपक्रमासाठी संग्रामनगर ग्रामपंचायत चे सरपंच पंकज गाडे, उपसरपंच सौ. स्मिता माने देशमुख, ग्रामसेवक सुधाकर मुंगुसकर व जीवन सहारा परिवार ,बालाजी फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभलेचौकटपर्यावरण रक्षक: मेजर शिवाजी पठाडे यांचा प्रेरणादायी प्रवासमेजर शिवाजी पठाडे हे भारतीय सैन्यातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून, देशसेवेसोबतच पर्यावरण रक्षणासाठी देखील ते अथक परिश्रम घेत आहेत. सैन्यातील जबाबदाऱ्या सांभाळून सुट्टीच्या काळात ते वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करतात. 2017 पासून त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीत आतापर्यंत लाखो झाडे लावली आणि ती जगवली आहेत. त्यांनी नगर, पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून हे कार्य यशस्वीपणे पुढे नेले आहे.मेजर पठाडे यांचे उद्दिष्ट केवळ वृक्षारोपण करणे नाही, तर पुढील पिढ्यांसाठी एक समृद्ध, हरित आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण निर्माण करणे आहे. त्यांनी ‘ऑक्सिजन पार्क’, ‘शौर्य सृजन बाग’ ‘श्रीराम वन वाटिका’, ‘पावन गणपती वडराई प्रोजेक्ट’, ‘यशवंत ऑक्सीजन पार्क’, ‘पद्मश्री पोपटराव पवार उद्यान’, आणि इतर अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प हाती घेतले आहेत. या उपक्रमांमधून ते समाजाला निसर्गसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.






