ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब, तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माध्यमिक विभागामध्ये संस्थेचे युवा संचालक माननीय श्री प्रताप सिंह कदम यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले..
कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री अर्जुन सर, पर्यवेक्षक श्री आळंद सर,शिक्षक प्रतिनिधी श्रीमती पाटील मॅडम, काशीद सर, श्रीमती सोलनकर मॅडम , श्री राऊत सर, श्री माने सर, श्री धनवडे सर, श्री देवकर सर, श्री पावरा सर, व श्रीमती हजारे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात साजरा झाला ..






