*चि.सयाजीराजे मोहिते पाटील यांनी केले जाधव कुटूंबाचे सांत्वन.*
अकलूज (प्रतिनिधी )संग्रामनगर (जाधव वस्ती )येथील सुभाष पांडुरंग जाधव(वय 70वर्षे )यांचे 25नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
दरम्यान 27नोव्हेंबर रोजी चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी सांत्वनपर भेट देऊन या कुटूंबाचे सांत्वन केले.
यावेळी हरिदास विष्णू जाधव, सुरेश दामू पवार, किसन नंदकुमार जाधव, संतोष दत्तात्रय जाधव. विनायक गजानन जाधव, इत्यादी उपस्थित होते.






