दीपावली सणा निमित्त खरेदीसाठी अकलूज मध्ये ग्राहकांची लगबग

अकलूज (प्रतिनिधी )दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्ताने अकलूज शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी कपडे, कंदील, विद्युत दिवे, रांगोळी आणि दिवाळी साहित्य खरेदीसाठी शनिवार सकाळपासूनच गर्दी केली होती.
सोमवारपासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळी सणाकरिता नागरिक कपडे, कंदील, विद्युत दिवे, पणत्या, रांगोळी असे साहित्य खरेदी करतात. यामुळे दिवाळीच्या पंधरा दिवस आधीपासूनच दिवाळी साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत येते आणि त्याठिकाणी नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येतात. हेच चित्र बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. यंदाही दिवाळीनिमित्त आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी, सजावटीचे साहित्य, कपडे अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.
तर, व्यापाऱ्यांनी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांबाहेर विद्यूत रोषणाई तसेच सजावट केली आहे. शहरातील रस्तेही विद्यूत रोषणाईने उजळून निघाले आहेत. या विद्युत रोषणाईमुळे तसेच दुकानांची सजावट पाहून नागरिकांचा खरेदीसाठी उत्साह वाढला आहे.
अकलूज येथील विजय चौक येथील कमलेश व निलेश शहा या बंधूच्या शहा एंटरप्रायजेस या दुकानात दीपावली सणा निमित्त सजावटी च्या आकर्षक वस्तू विक्री साठी ठेवण्यात आल्या आहेत.विविध प्रकारचे व विविध आकारातील मनमोहक असे आकाशकंदील, लाईट च्या माळा, विविध प्रकारच्या पणती, मेणबत्ती, सुवासिक उदबत्ती, धूप तसेच इतरही अनेक प्रकारच्या होलसेल दरात मिळत असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी परिसरातील ग्राहकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे दुकानदार कमलेश व निलेश शहा यांनी सांगितले.






