अकलूज दीनांक १३

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हा संघाचा मूलभूत विचार आहे असे विचार डॉक्टर सचिन वसंतराव लादे पुणे विभाग सह प्रचार प्रमुख यांनी अकलूज येथे विजयादशमी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सांगितले
श्री लादे यांनी स्वयंसेवकांना संबोधित करताना पुढे सांगितले 1925 पासून विजयादशमी या दिवशी संघाची स्थापना झाली त्याचे औचित्य साधून दरवर्षी विजयादशमी या दिवशी संघातील कार्यकर्ते संचलन करतात एक राष्ट्र म्हणून भारत हा हिंदू राष्ट्रच आहे वर्षातून एकदा या विचाराची व्यापकता समाजास प्रदर्शित होण्यासाठी विजयादशमीच्या निमित्ताने होणाऱ्या संचलनाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक 13 रोजी सकाळी आठ वाजता येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व गटातील स्वयंसेवक एकत्रित एकत्र येऊन विजयादशमी चे संचलन सुरू झाले.
यामध्ये अश्वावर स्वयंसेवक परम पवित्र भगवा ध्वज घेऊन स्वार होते तर भारत मातेच्या प्रतिमेसह घोष पथक, वाद्यपथक यासह 180 स्वयंसेवक गणवेशासह सहभागी झाले होते सदर पथसंचलन अकलूज गावातील प्रमुख मार्गावरून जाताना ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी केल अकलूज येथील नामदेव मंगल कार्यालय येथे प्रमुख वक्ते डॉक्टर सचिन वसंतराव लादे यांनी आपले बौद्धिक विचार मांडले
प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखापरीक्षक श्री शशील गांधी हे होते सदर प्रसंगी जिल्हा संघचालक तालुका, संघ चालक, जिल्हा कार्यवाहक तालुका कार्यवाह, तालुका सहकार्यवाह, व अकलूज उपखंडातील स्वयंसेवक हे उत्साहाने सहभागी झाले होते प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली






