शिवाजी गाडे यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी )संग्रामनगर ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच पंकज शिवाजी गाडे यांचे वडील व माजी उपसरपंच उमाकांत गाडे यांचे आजोबा शिवाजी शंकर गाडे (वय 80वर्षे) यांचे दुपारी 4-30वाजता निधन झाले.
अंत्यविधी संध्याकाळी 9-30वाजता अकलाई स्मशानभूमी येथे होणार आहे..त्यांच्या पाठीमागे पाच मुले, सुना, सात नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या तिसऱ्याचा (सावडण्याचा )विधी रविवारी सकाळी होणार आहे.
ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






