अकलूज येथील मोफत डोळे, नेत्ररोग व मधुमेह तपासणी शिबीरात 250रुग्णांची तपासणी



अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथे गुरुवार, दिनांक- १९/०९/२०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शिव फाउंडेशन व शिवशक्ती क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे, नेत्ररोग व मधुमेह तपासणी शिबीराचे जुना पंढरपूर रोड, महर्षी कॉलनी, दत्त मंदिर जवळ, शिवशक्ती क्लिनीक, अकलूज या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात मोफत डोळे तपासणी,मोफत व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया,अल्प दरात चष्मे वाटप,डोळ्यांतील मांस काढणे मोफत शस्त्रक्रिया,डोळ्यांवरून सुजकरिता मोफत इंजेक्शन,डोळ्यांतील तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिया,मोफत साखर (मधुमेह) तपासणी, इत्यादी 250रुग्णांच्या तपासणी करण्यात आल्या.
तसेच काही रुग्णांवर पुणे येथे डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
सदर शिबीर हे शिवशक्ती क्लिनीक, विजय मेडिकल डॉ. एच.व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ. एच.व्ही देसाई हॉस्पिटल पुणे येथील सहकारी, शिव फौंडेशन च्या अध्यक्ष डॉ. शिवानी बागल,शिवशक्ती क्लिनीक चे डॉ. विश्व्जीत सावंत, विजय मेडिकल चे ज्ञानराज काटे, संदीप खंडागळे, दत्तात्रय साठे महाराज, सागर खंडागळे, निराशा भारत सटाले, प्रशांत कोकाटे, नामदेव सावंत, पत्रकार गणेश जाधव, अजित लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.






