कै.रोहित बाळकृष्ण सुर्यवंशी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त रक्तदान शिबीर संपन्न
अकलूज (रणजितदादा गायकवाड )

अकलूज येथील कै. रोहित बाळकृष्ण सुर्यवंशी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जयशंकर उद्यान येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे एकनिष्ठ धारकरी कै.रोहितदादा सुर्यवंशी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये तब्बल 74 रक्तदात्यांनी रक्तदान करून कै.रोहितदादा सुर्यवंशी यांच्या पवित्र आत्म्यास श्रध्दांजली अर्पण केली. श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष भुषण सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा प्रमुख रणजितदादा गायकवाड,तालुका प्रमुख सुधीरदादा पवार ,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका प्रमुख गणेश इंगळे, शुभम सुर्यवंशी, वैभव वडतिले, अभिजित बाबर, गणेश जाधव, विष्णू सुर्यवंशी, तुषार सुर्यवंशी. यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माळशिरस तालुका व धारकरी कै.रोहितदादा सुर्यवंशी फाऊंडेशन चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चे सोलापूर जिल्हा प्रमुख रणजितदादा गायकवाड यांनी ४८ व्या वेळी रक्तदान करतानाच त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला पण पहिल्यांदा रक्तदान करायला प्रवृत्त केले व हि रक्तदानाची चळवळ पुढे जोमाने सुरू करण्याची सुरुवात केली व ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरामध्ये सहभाग घेतला त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करणार्या रक्तदात्यास एक वर्ष भर महाराष्ट्रात कुठेही मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते.याचा सर्व रक्तदात्यानी लाभ घ्यावा असेही बोलताना सांगितले.






