सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याची अकलूज येथे 18 ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी ) सकल मराठा समाज माळशिरस तालुकायांचे वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार रविवार दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता अकलूज शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज माळशिरस तालुका व माळशिरस तालुका सकल मराठा समाज कोअर कमिटीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा व विचारविनिमय करून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अहवाल सादर करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केले आहे.
तरी सकल मराठा समाज माळशिरस तालुक्यातील कोअर कमिटीसह सर्व मराठा समाज बांधवांनी सायंकाळी 4.00वाजता अकलूज शासकीय विश्रामगृह येथे वेळेवर उपस्थित रहावे.
असे आवाहन सकल मराठा समाज, माळशिरस तालुका यांचे वतीने करण्यात आले आहे.






