कै. भागुबाई शिवाजी गाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त युवा कीर्तनकार विश्वास महाराज पवार यांचे फुलांचे कीर्तन संपन्न अकलूज (प्रतिनिधी )संग्रामनगर, अकलूज येथील सुमित्रा कॉलनी येथे कै. भागुबाई शिवाजी गाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गारअकोले येथील युवा कीर्तनकार विश्वास महाराज पवार यांचे 27जुलै रोजी सकाळी 10ते 12या वेळेत फुलांचे कीर्तन संपन्न झाले.
लेकुराचे हित । पाहे माऊलीचे चित्त ।।१।। ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रिती ।।२।। पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ।।३।। तुका म्हणे माझे । तुम्हा संतावरी ओझे ।।४।। या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातून त्यांनी आईचा महिमा विषद केला.

आपल्या लेकराचे हित कशात आहे या विषयीची चिंता माऊलीचे चित्त त्या आईचे चित्तच वाहत असते. अशी ही कळवळयाची जात आहे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करत असते. अशी ही विलक्षण जात असणारी माता नऊ महिने त्या मुलाला पोटात वाढवते व त्याचा सर्व त्रास सहन करते.
कै. भागुबाई शिवाजी गाडे यांनी आपले पती शिवाजी गाडे यांच्या साथीने आपल्या पाच ही मुलांचा सांभाळ कष्टाने व जिद्दीने केला. चांगले संस्कार केले.ते पुढे बोलताना म्हणाले की, जगात सर्वात श्रेष्ठ आई आहे. कोणताही स्वार्थ मनात न बाळगता आई आपल्या लेकराचे हित जोपासत असते. उदरात असल्यापासून आपल्या बाळावर चांगले संस्कार करते. त्यामुळे आईची तुलना कोणाबरोबर ही करता येत नाही.वेगवेगळ्या उदाहरणं चे दाखले देत त्यांनी आईचा महिमा वर्णन केला.
यावेळी उपस्थिताना अश्रू आवरले नाहीत.
यावेळी शिवाजी शंकर गाडे, विलास गाडे, किसन गाडे, विष्णू गाडे, बाळासाहेब गाडे, संग्रामनगर ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच पंकज गाडे, माजी उपसरपंच उमेश गाडे, शिरीष गाडे, विक्रमसिंह गाडे,रणजित गाडे, आकाश गाडे, प्रज्वल गाडे, प्रियांशु गाडे यांचेसह नातेवाईक, मित्रमंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.






