विर धरणातून नदिमध्ये पाणी सोडण्याबरोबरच उजव्या कालव्यातून पाणी सोडून लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून घ्यावेत
माळशिरस प्रतिनिधी रणजीतदादा गायकवाड
सध्या विर भाटघर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक पाणी जमा झाले आहे. त्यामुळे नीरा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.. त्याउलट माळशिरस तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी आजुनही समाधान कारक पाउस पडला नाही तालुक्यातील जवळपास सर्वच लहान मोठे पाझर तलाव अजुनही कोरडेच आहेत सुरवातीला झालेल्या थोड्याफार पावसाच्या भरोश्यावर आनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत पिकं चांगली उगवले आहेत पण पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडून माळशिरस तालुक्यातील छोटे मोठे पाझर तलाव भरून घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे अशी मागणी होत आहे नदीत पाणी सोडल्यामुळे काहीच फायदा होणार नाही त्या उलट उजव्या कालव्यातून पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे







