सोशल मीडियावरती वारंवार वादग्रस्त पोस्ट टाकून हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची संख्या सध्या वेळापूर व परिसरात वाढली आहे. दरम्यान या समाजकंटकांचा निषेध करण्यासाठी व प्रभू श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावरती धमक्या देणारे स्टेटस ठेवल्याने त्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावेत म्हणून वेळापूर व परिसरातील हिंदू समाज बांधवांनी वेळापूर पोलिसांना निवेदन दिले आहे. जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशी भावना यावेळी हिंदू समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वेळापूर बंदची हाक सकल हिंदू समाज वेळापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे. वेळापूर व परिसरातील व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवून बंद पाळावा असे आवाहन हिंदू समाज बांधवांनी केले आहे.






