सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे
:कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे पंढरपूरकडे – बेकायदारित्या गुटखा घेवून जाणारा महिंद्रा पिकअप शहराजवळील ब्रीज जवळ पोलीसांनी पकडून १७ लाख २० हजार – वाहनासहमुद्देमाल जप्त करुन वाहन – चालक संदिप रामचंद्र लाड (वय ३६), वाहन मालक भूषण बाळासाहेब होमकर – (दोघे रा. पंढरपूर) या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, कर्नाटक राज्यातील येथून दि.६ रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान एम.एच.१३ डी.क्यू २६३९ हे पिकअप बेकायदारित्या गुटखा घेवून येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मिळताचत्यांनी मंगळवेढा शहराजवळील रिलाइन्स पेट्रोल पंपाजवळ ब्रीजच्या खाली सापळा लावला असता एक संशयीत वाहन येत असल्याचे पोलीस पथकाला दिसले.दरम्यान पोलीस पथकाने त्या वाहनाच्या चालकास थांबण्याचा इशारा केल्यावर आरोपी तथा चालक संदिप लाड याने वाहन उभे केले.
यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आपला परिचय सांगून सदर वाहनामध्ये काय आहे.याबाबत विचारले असता विमल पान मसाल्याचे पोते असल्याचे आरोपीने सांगितले. यावेळी पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता पान मसाल्याचे पोते असल्याची खात्री होताच सदरचे वाहन आणून लावले.यामध्ये १ लाख ९८ हजार रुपये किंमतीची ५ पोती विमल पान मसाला, २२ हजार रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू १ पोते, ७२ हजार रुपये किंमतीचा विमल पान मसाला, ६ लाखाची महिंद्रा गाडी असा एकूण १७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
याची फिर्याद सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनचे उमेश भुसे यांनी दिली आहे. याचा अधिक तपास पोलीस नाईक दुधाळ हे करीत आहेत.






