रुग्णवाहिका- चार चाकी यांच्या अपघातात डॉ. वसंत भोसले यांचा मृत्यू
अकलूज (प्रतिनिधी )सातारा लातूर महामार्गावर गारवाड पाटी तालुका माळशिरस येथे रुग्णवाहिका व टोयाटो चार चाकी गाडी यांची धडक होऊन टोयाटो चारचाकी गाडी चे चालक डॉक्टर वसंत भोसले (वय ३५) रा अकलुज यांचा मृत्यू झाला.
याबाबत जिल्हा परिषदेचे आरोग्य मीडिया अधिकारी रफिक शेख यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की रुग्णवाहीका क्रमांक एम एच ११ सी एच ९३ २४ टी म्हसवड येथुन एका रुग्ण बालकाला घेऊन अकलुज च्या दिशेने चालली असता गारवाड पाटी येथे मानकी हुन अकलुज कडे निघालेली टोयाटा कार (एमएच १० बीए ४३ ४५) याची जोरदार धडक झाली या धडकेत कार चालक डॉ वसंत भोसले रा अकलुज हे गंभीर जखमी झाले त्यांना अकलुज येथील अश्वीनी हॉस्पीटल येथे नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात टोयाटा कारचे मोठे नुकसान झाले आहे या बाबत माळशिरस पोलीसांत खबर देण्यात आली आहे.
डॉ वसंत भोसले हे प्राथमिक आरोग्य केंद्र मानकी येथे कार्यरत होते.यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. ऐन तारुण्यात त्यांचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.






