दिव्यांच्या रोषणाईत आणखी एक दिवा लावण्यापेक्षा तो अंधारात लावावा ! अंधाराला आनंद होतो त्यापेक्षा दिव्याला अधिक आनंद होतो! याउक्तीप्रमाणे माळशिरस तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आम्ही अकलूजकर या समूहाच्या वतीने अकलूज शहरातील विविध भागात तसेच परिसरात राहणाऱ्या गोरगरीब,अनाथ तसेच स्माशनभूमीत रहाणा-या १४५ कुटुंबांना दिवाळी फराळासह वयोवृद्ध मातांना तसेच निराधार विधवा भगिनींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून साडी भेट देऊन सार्थक दिपावली साजरी करण्यात आली
मागील ९ वर्षापासून या समूहाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप,सांगलीतील पूरग्रस्तांसाठी विविध वस्तूंचे वाटप,रक्तदान शिबिर,कोरोना काळात अन्नदान यासारखे अनेक उपक्रम राबवले जातात. यंदाही आम्ही अकलूजकर या समूहाकडून शहर व परिसरात विविध ठिकाणी हातावरचे पोट असलेल्या गोरगरीब, निराधार ,वंचित कुटुंबाची माहिती घेऊन त्यांना दिवाळीसाठी लागणाऱ्या चिवडा,शंकरपाळे,लाडू, चकली यासारख्या दिवाळी फराळासोबतच दिवाळीसाठी लागणाऱ्या सुंगधी उठणे,साबण, सुगंधी तेल व पणत्या तसेच माता भगिनींना साड्या देऊन या कष्टकरी लोकांची दिवाळी गोड केली.
यावेळी मराठा व्यावसायिक संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ सावंत, सदाशिवराव माने विद्यालयचे मुख्याध्यापक अमोल फुले, चार्ट अकाउंटंट नितीन कुदळे साहेब राजीव बनकर, माळशिरस तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,महर्षि प्रशाला सदस्य अनिल जाधव,संजय जगदाळे,दिग्विजय देशमुख आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम्ही अकलूजकर समूहाचे संस्थापक प्रा.धनंजय देशमुख यांनी केले तर आभार सचिव सुहास शेटे सर यांनी मानले.






