गौरी समोर संसार ची आरास.
अकलूज (प्रतिनिधी )सध्या गणेशोत्सव ची सर्वत्र धामधूम असताना गौरी चे देखील आगमन झाले. अनेक ठिकाणी गौरी समोर वेगवेगळे देखावे करण्यात आले.परंतु संग्रामनगर येथील सौ. कोमल सागर आसबे यांनी मात्र कल्पकतेने गौरी समोर संसार थाटला आहे. संसारासाठी उपयुक्त असणारी भांडी, सत्यनारायण पूजा, तसेच गहू नीट करणारी गौरी, जात्यावर दळण दळणारी गौरी.दुध देणारी गाय. असा कल्पक देखावा गौरी समोर मांडला. हा देखावा पाहण्यासाठी संग्रामनगर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.अनेकांनी सौ. कोमल सागर आसबे यांचे कौतुक केले.






