अकलूज येथील गणेशमूर्ती विक्रेत्यांकडून छ. शिवाजी महाराज यांच्या होणान्या अवमानाबाबत सकल मराठा समाज यांचे वतीने निवेदन


अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील गणेशमूर्ती विक्रेत्यांकडून छ. शिवाजी महाराज यांच्या होणान्या अवमानाबाबत सकल मराठा समाज, माळशिरस तालुकायांच्या वतीने अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असे सांगितले आहे की,गणेश चतुर्थी निमित्त अकलूज आणि परिसराज गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध केल्या जात आहेत, मात्र यामध्ये जाणीवपूर्वक, खोडसाळपणा केला जात आहे.बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण छ. शिवाजी महाराज महाराज यांची छोटी मूर्ती गणपती शेजारी तयार करुन बसविली आहे. यामुळे छ. शिवाजी महाराज यांचे जाणीवपूर्वक देवीकरण केले जात आहे. तसेच दहा दिवसांनी गणेश विसर्जनावेळी छ. शिवाजी महाराज यांची मूर्ती विसर्जीत केली जाणार आहे.

हा खोडसाळपणा जाणीवपूर्वक केला जात आहे.यामुळे बहुजन समाजाबरोबर, मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे.
यामुळे ऐन सणासुदीच्या काळात तेढ निर्माण होऊन कायदा व सुवस्थेला प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे प्रशासनाने अशा मूर्ती विक्रेत्यांना या मूर्ती विकू देऊ नये व हे अघोरी कृत्य करणान्यावर कडक कारवाई करावी अन्यथा होणान्या परिणामास प्रशासक जबाबदार राहील.
असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर धनाजी साखळकर,आशुभाऊ ढवळे,वल्लभ सांगडे,प्रताप चव्हान,,संतोष मगर आदींच्या सह्या आहेत.






