*शासनाच्या जमीनीवर असलेल्या झोपडपट्ट्या अतिक्रमणे कायम करा-लालासाहेब अडगळे*

अकलूज( प्रतिनिधी) – अकलूज नगरपरिषद हद्दीतील झोपडपट्टी विकास नगर, नागोबा कट्टा, मटन मार्केट, लक्ष्मीनगर, नायर झोपडपट्टी या भागातील झोपडपट्टी परिसरात गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रहात आहेत. या परिसरात राहणाऱ्या सर्वच कुटुंबांना त्यांची स्वतःची घरे नाहीत. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली परंतु या भागातील लोकांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. शासनाच्या जागेवर झोपडपट्टी असल्याने त्यांच्या नावावर जागा नाही. आणि जागा नावावर नसल्याने शासकीय विविध योजनांचा लाभ घेता आलेला नाही. अकलूज ग्रामपंचायत काळात या परिसरातील झोपडपट्टीतील लोकांचे पुनर्वसन करण्यात आले होते. या झोपडपट्टी मध्ये पाऊस चालू झाल्यावर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होत असते. येथिल कुटुंबाना ओढ्याच्या पाण्यामुळे स्थलांतरित करावे लागत असते.त्यामुळे या विकासनगर, नागोबाकट्टा, मटन मार्केट, लक्ष्मीनगर, नायर झोपडपट्टी या भागातील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या हक्कांची घरे देण्यासाठी अकलूज नगरपरिषदने प्रस्ताव तयार करुन शासनाच्या जागेवर संबंधित झोपडपट्टी अतिक्रमण कायम करुन या झोपडपट्टी धारकांना त्यांच्या आता रहात असलेल्या जागेतच शासनाच्या कोणत्या योजने मार्फत या झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन करता येईल. व अकलूज नगरपरिषद मार्फत सर्वच वरील भागाचा पुर्नसर्वे करुन अकलूज नगरपरिषद हद्दीत असणार्या या दलदल युक्त परिसराचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा.नविन योजना आराखडा तयार करावा. व पिढ्यानपिढ्या दलदल युक्त परिसरात राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना योग्य मार्गदर्शन करुन कशाप्रकारे त्यांना झोपडपट्टी मुक्त करता येईल यासाठी अकलूज नगरपरिषदने शासनाच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासनगर, नागोबाकट्टा, मटन मार्केट, लक्ष्मीनगर, नायर झोपडपट्टी या भागातील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व आता असणारे अतिक्रमणे कायम करावीत.असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अकलूज शहर अध्यक्ष लालासाहेब अडगळे यांनी अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी मा. श्री. दयानंद गोरे साहेबांना निवेदन देऊन व्यक्त केले. झोपडपट्टीतील लोकांना लवकरच त्यांच्या हक्कांची घरे देण्याचे आश्वासन अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी गोरे साहेबांनी दिले.






