दत्तनगर- खंडाळीच्या ग्रामस्थांकडून अकलूज आगारास एलईडी लॅम्प भेट
सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने स्वच्छ सुंदर आगार ही संकल्पना चालू आहे ही संकल्पना लोकसहभागातून करावयाची आहे यासाठी मोठी चळवळ अकलूज आगाराचे व्यवस्थापक यांनी उभी केलेली आहेयाचाच एक खारीचा वाटा म्हणून दत्तनगर येथील ग्रामस्थांनी अकलूज आगाराला तीन शंभर वॅट एलईडी लॅंप भेट म्हणून दिलेल्या आहेत’प्रवाशांच्या सेवेसाठी’ असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाचे अकलूज आगार हे नव्या स्वरूपात आणले असून नवीन एसटी स्टँड वर विमानतळाचा भास होत आहे असे वाटतेज्या पद्धतीने दत्तनगरच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने अकलूज आगाराच्या वैभवात एलईडी देऊन भर घातली आहे असाच उत्साह तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी दाखवावा असे आवाहन या निमित्ताने आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी केले व दत्तनगरच्या ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच दत्तनगर येथील शाळेच्या मुलांसाठी पर्यायी बसची व्यवस्था केल्याबद्दल आगार व्यवस्थापक शिंदे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने स्वप्निल गायकवाड यांनी केला. यावेळी अकलूज आगाराच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात गणेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यशाळा अधीक्षक अनिरुद्ध सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक सोनवलकर, वाहतूक नियंत्रक राजू गोसावी मालवाहतूक निरीक्षक विजय लंगोटे ,वाहतूक नियंत्रण विजय रंधवे, दत्तनगर चे ग्रामस्थ विनोद थिटे,सुयोग पवार ,गणेश काळे, डॉ.धोतरे,अमीन शेख, शिवाजी साबळे, किसन कांबळे, विलास शिंदे, बाळासो जगताप, आकाश पवार, प्रथमेश वारुळे, आबा पवार,राहूल हिप्परकर, अशोक पताळे, मनोज थिटे,दिगंबर सोनवणे व भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू गोसावी तर आभार अमोल पिंपळे यांनी मानले






