*भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन रावबहाद्दूर गट (बिजवडी) शाळेत उत्साहाने साजरा, दातृत्वाचे झाले दर्शन!!*
*जहाँ डाल डाल पर सोनेकी चिडीयाँ करती है बसेरा… वो भारत देश है मेरा..वो भारत देश है मेरा!* अशा महान भारत देशाच्या स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन रावबहाद्दूर गट (बिजवडी) शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बिजवडी गावच्या उपसरपंच सौ. वर्षाताई मदने तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. आशा भजनावळे या होत्या. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बिजवडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. मनोज( तात्या) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केला गेला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीकांत राऊत सर यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये शाळेची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्तीपर गीते सादर केली. निपुण भारत अंतर्गत माता पालक गटप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.गटप्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले.
युवा उद्योजक श्री. विशाल भोरे यांनी आपले वडील कै. मधुकर विठ्ठल भोरे यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी माईकसह ब्लूटूथ साउंड सिस्टीम भेट दिली. युवा उद्योजक हेमंत टेके साहेब यांनी शैक्षणिक साहित्य शाळेसाठी दिले. त्याचबरोबर श्री.महादेव पराडे पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी आठ डझन वह्या भेट दिल्या. विद्यार्थ्यांना विविध दानशूर व्यक्तींनी खाऊ दिला. अशाप्रकारे जवळ जवळ ११०००/- रुपये शैक्षणिक उठाव आज शाळेने मिळविला.
सदर कार्यक्रमासाठी सौ. स्वाती जाधव, दिपाली लोखंडे, इब्राहिम नदाफ, सागर भजनावळे, अर्चना चव्हाण, मरीबा लोखंडे,संजय मदने ,युवराज सुळ, दीपक टिळेकर, नामदेव चव्हाण अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण, गिरीजा गेजगे असे बहुसंख्येने शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमासाठी बिजवडी गावच्या सरपंच सौ. पूजाताई शिंदे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजमीर फकीर सर यांनी केले, तर आभार श्री. श्रीकांत राऊत सर यांनी मानले.






