अकलूज येथील प्रसिद्ध व्यापारी राजेश महादेव महाडिक यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी )येथील प्रसिद्ध व्यापारी राजेश महादेव महाडिक (वय ४९ )यांचे राहत्या घरी गुरुवार दि.२० रोजी सकाळी निधन झाले.ते गुरुकृपा उद्योग समूहाचे मालक होते.त्यांचे पश्चात आई, वडील पत्नी, भाऊ,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.त्यांचेवर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसऱ्याचा (सावडण्याचा )विधी 22जुलै रोजी सकाळी होणार आहे.ते अत्यंत धार्मिक, मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







