अकलूज मधील रुग्णवाहिकेच्या चालकांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होतेय आर्थिक लूट
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज हे मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक डॉक्टर चांगली सेवा देत आहेत.अकलूज परिसरात अनेक रुग्णवाहिका आहेत. काही रुग्णवाहिका सामाजिक बांधिलकी जोपासत शासकीय दरात रुग्णांची ने -आण करतात. परंतु काही रुग्णवाहिका मात्र रुग्णांची ने-आण करताना रुग्णवाहिका चालक-मालक रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट करीत आहेत
.2021मध्ये कोरोना च्या काळात देखील मोठया प्रमाणावर रुग्णांची लूट होत होती. हे लक्ष्यात आल्यानंतर जनहित संघटनेचे किरण भांगे यांनी या संदर्भात आंदोलन देखील केले होते. त्यावेळी शासकीय दर निश्चित करण्यात आले होते.परंतु आता पुन्हा एकदा लूट सुरु आहे.
अकलूज (संग्रामनगर )येथील एका वयोवृद्ध महिलेवर 9जुलै रोजी अकलूज क्रिटिकल येथे उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्या महिलेचे निधन झाले. दवाखान्या पासून केवळ 500मीटर पर्यंत घरी नेण्यासाठी या हॉस्पिटल च्या आवारात असलेल्या रुग्णवाहीकेच्या चालकाने 800रुपये ची मागणी केली.तडजोडी नंतर 600₹घेतले.
असे प्रकार अकलूज परिसरात अनेक ठिकाणी घडत आहेत. परिसरात अनेक रुग्णवाहिका आहेत. काहीजण योग्य ते भाडे आकारणी करतात. तर काहीजण जादा भाडे आकारून लूट करीत आहेत.त्यामुळे प्रत्येक रुग्णवहिकेत शासकीय दर फलक लावावेत. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबतच्या तक्रारी अनेकवेळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) गेल्याने आरटीओने सुधारित दरपत्रक जाहीर केले आहे. या दरपत्रकानुसार तीन प्रकारच्या रुग्णवाहिकांना 11 रुपये पासून 13 रुपये प्रति किलो मीटर भाडे आकारता येणार आहे. पहिल्या 25 किलोमीटरसाठी अथवा दोन तासांसाठी 500 ते 900 रुपये भाडे आकारता येणार आहे. तसेच हे दरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांना तातडीने दवाखान्यामध्ये घेऊन जाणे तसेच विविध डायग्नोस्टिक सेंटर मध्ये रुग्णाला घेऊन जाण्याकरता रुग्णवाहिकांची आवश्यकता नागरिकांना भासत आहे. रुग्णवाहिका मालक – चालक यांच्याकडून रुग्णाची वाहतूक करताना जास्तीचे भाडे आकारले जात आहे. त्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अकलूज आरटीओकडून सुधारित दरपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
ज्या रुग्णवाहिका मालक-चालक ठरवून दिलेल्या भाडेदरापेक्षा जास्त आकारणी करतील अशा वाहनधारकाची तक्रार करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.अशा तक्रारीची नोंद घेऊन त्यांच्यावर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे
.सर्व रुग्णवाहिका चालक मालक संघटना, रुग्णालयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णसेवा करावी व कोणत्याही रुग्णाकडून अतिरिक्त भाडे आकारणी करण्यात येऊ नये असे आवाहन अकलूज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक –
1. रुग्णवाहिका प्रकार – मारुती25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 500 रुपयेपराती किलोमीटरसाठी दर – 11 रुपयेप्रति प्रतीक्षा तास – 50 रुपये2. रुग्णवाहिका प्रकार – टाटा सुमो, मेटाडोर इत्यादी सदृश कंपनीने बांधणी केलेली रुग्णवाहिका25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 600 रुपयेपरती किलोमीटरसाठी दर – 12 रुपयेप्रति प्रतीक्षा तास – 75 रुपये3. रुग्णवाहिका प्रकार – टाटा 407, स्वराज मझदा इत्यादी चॅसीसवर बांधणी केलेली रुग्णवाहिका25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 900 रुपयेपरती किलोमीटरसाठी दर – 13 रुपयेप्रति प्रतीक्षा तास – 100 रुपये
रुग्णवाहिका चालक-मालक यांच्यासाठी अटी आणि शर्ती –
वरील भाडेदर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी लागू आहेत.# वरील भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी आहेत. 25 किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास प्रति तास प्रमाणे भाडे वाढ होईल. प्रतिक्षादर लागू राहतील.# हे दरपत्रक रुग्णवाहिकेत आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे.# वाहन प्रवास न करता उभे असल्यास प्रत्येक तासाकरीता प्रतिक्षा दर लागू राहतील.# प्रस्तावीत केलेल्या कमाल भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारात येणार नाही.# रुग्णवाहिकेला जीपीएस प्रणाली असणे आवश्यक आहे.# प्रत्येक फेरी नंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.# मोटार वाहन कायदा व त्यातील तरतुदीनुसार वेळोवेळी लागू होणारे नियम व अटी लागू राहतील.# सर्व रुग्णवाहिका वातानुकूलित असल्याचे ग्राहय आहे. तसेच आवश्यकतेनुसार किंवा रुग्णाच्या विनंतीनुसार वातानुकूलित यंत्रणा चालू अथवा बंद ठेवता येईल.






