शनिवारी वेळापूर येथे सकल हिंदू समाजाचा मोर्चा
अकलूज (प्रतिनिधी )शनिवार दिनांक 15 जुलै रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने वेळापूर ता.माळशिरस येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चास संबोधित करण्यासाठी आमदार नितेश राणे उपस्थित राहणार असल्याचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने अकलूजचे प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की,वेळापूर येथील काही समाजकंटकांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटस ला ठेवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये काही त्रुटी आहेत तसेच हिंदू समाजाच्या अन्य मागण्या संदर्भात 15 जुलै 2023 रोजी सकाळी दहा ते बारा पर्यंत वेळापूर येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून हा मोर्चा सर्व नियम पाळून व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार आसून या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आ.नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. इतर सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन 15 जुलै रोजी अधिकृतपणे देण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.






