मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी घेतली रणजित गायकवाड यांची सदिच्छा भेट
अकलूज (प्रतिनिधी )मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे व भुषणदादा सुर्वे यांनी पंढरपूर येथे जाताना आवर्जून अकलूज मध्ये थांबुन मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षचे माळशिरस तालुका समन्वयक रणजितदादा गायकवाड यांची भेट घेतली व रणजित गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले. व या पुढेही असेच कार्य करत रहावे असा सल्ला दिला.यावेळी मंगेश चिवटे यांनी अनेक विषयावर चर्चा केली. तसेच गरजू रुग्णांनी संपर्क साधून मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षचे वतीने करण्यात येत असलेल्या मदतीचा लाभ घ्यावा. असे आवर्जून सांगितले.यावेळी मंगेश चिवटे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.






