9 वर्षाच्या* कार्यकाळ पूर्ती निमित्त मोदी@9 या अभियानाअंतर्गत ‘भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका’ यांच्या वतीने घरो घरी जनसंपर्क अभियान
अकलूज (प्रतिनिधी )देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळ पुरती निमित्त मोदी@9 या अभियानाअंतर्गत ‘भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका’ यांच्या वतीने सुजयनगर 6 – अकलूज
या ठिकाणी या अभियानाअंतर्गत असलेला घरो घरी जनसंपर्क अभियान कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
सदर कार्यक्रमास भाजप चे संघटन सरचिटणीस धैर्यशील (भैय्यासाहेब)मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबु, तालुका सरचिटणीस .संदिप मामा घाडगे, तालुका सरचिटणीस सुरज मस्के, स्वप्निल शहाणे, निलेश ननवरे, अमित पुंज,सोशल मिडिया सहसंयोजक रोहन पवार तसेच सर्व सेल चे पदाधिकारी,कार्यकर्ते व सुजयनगर 6 ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











