नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये:- दीपरतन गायकवाड
अकलूज :– अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड यांनी अकलूज येथील विजय चौक येथे पोलिसांची दंगल काबू मॉक ड्रिल घेतली यावेळी जर शहरात दंगल झाली किंवा दंगल जन्य परिस्थिती निर्माण झाल्यास अशावेळी पोलिसांनी दंगल शांत करण्यासाठी कशाप्रकारे सामोरे जायचे याबाबत पोलिसांनी मॉक ड्रिल चे प्रात्यक्षिक करून दाखवले कोणत्याही अपप्रवृत्तीने गैर कृत्य करू नये व त्यांना दहशत बसावी यासाठी या मॉक ड्रिल आयोजन करण्यात आले होतेयावेळी नागरिकांना आवाहन करताना अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड म्हणाले पोलीस व ना नागरिक दोघांनी मिळून शहराची शांतता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे नागरिकांनी कोणतेही अफवावर विश्वास ठेवू नये काही समाजकंटक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी व्हाट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरण्याचे काम करत असतात अशा अफवावर कोणी विश्वास ठेवू नये असे कोण करत असेल तर नागरिकांनी त्वरित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नीरा स्नान करून 24 जून रोजी सकाळी अकलूज नगरीत येत आहे यावेळी अकलूज व परिसरातील नागरिकांनी शांतता राखून या पालखी सोहळ्याचा आनंद घ्यावा या पालखी सोहळ्याला गालबोट लागेल असे कोण वर्तन करत असेल तर ताबडतोब याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी असे आवाहन यावेळी दीपरतन गायकवाड यांनी नागरिकांना केले






