*पावसाळ्याच्या दृष्टीने महात्मा फुले भाजी मंडईचे दुरुस्तीकरन करा – शेखरभैय्या खिलारे*
योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने अकलूज येथील महात्मा फुले भाजी मंडई अकलूज या ठिकाणी अनेक शेतकरी,गोरगरीब,सामान्य लोक आपली उपजीविका भागवण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.सध्या मंडई विक्रीच्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यांनी बसण्यासाठी पूर्वी ग्रामपंचायतने केलेले स्टँडची पूर्णपणे मोडतोड झाली आहे. बसायच्या ठिकाणी त्या स्टँडच्या फळ्या मोडल्या आहेत तर वरच्या बाजूला व्यापाऱ्यांनी पोती बांधली आहेत एवढ्या वाईट अवस्थेत त्या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष चालू आहे तरी आज पर्यंत नगरपरिषद पूर्व व नंतर ही त्या व्यापारी वर्गाकरून कर रूपाने प्रशासन पैसे घेत आहे तरीही नगरपरिषद देखभाल व दूरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे येत्या सोमवार दि.१९/०६/२०२३ रोजी पर्यंत आमच्या मागणीचा विचार न झाल्यास मंगळवार 20 जून पासून भाजी मंडई येथील आणाभाऊ साठे स्मारक समोर नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखरभैय्या खिलारे यांनी अकलूज नगरपरिषदेला निवेदनाद्वरे दिला आहे.त्यावेळी असंघटीत कामगार युनियनचे तानाजीभाऊ साठे, करणभाऊ कांबळे(शिवसेना शाखाप्रमुख),सचिन खिलारे, बादशाहा गवळी,प्रीतीश पवार,आकाश दळवी इत्यादी उपस्थित होते.






