अकलूजमध्ये केमिस्ट भवनचा उदघाटन समारंभ व सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या च नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ व व्याख्यान उत्साहात संपन्न…
दि. 30 /4 /2023 रोजी अकलूज जि. सोलापूरमध्ये द्वारकानंदन मेडिकल शॉपी शेजारी, नवीन बस स्थानका जवळ केमिस्ट भवन चा उदघाटन समारंभ पार पडला. तसेच हॉटेल चेहीता याठिकाणी सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित जिल्हा सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नूतन संचालक तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव (पश्चिम विभाग)मा. श्री. बसवराज मनुरे, सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. व्यंकटेश पुजारी उपस्थित होते. या कार्यक्रमध्ये व्याख्याते म्हणून लाभलेले मा.श्री. हेमंत मोरे (अध्यक्ष,कराड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन) यांचे मेडिकल मॅनेजमेंट, मॉल व कॉर्पोरेट व्यवसाय कसा असतो या विषयावर तर मा. श्री. सुदर्शन पुकाळे (सी.ए) यांचे अडचणीत व्यापार की व्यापारातील अडचण या विषयावर सुरेख व्याख्यान झाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मा.श्री. राजेश विरपे (जिल्हा सचिव), मा. श्री. प्रशांत खलीपे (जिल्हा खजिनदार), मा. श्री. श्यामसुंदर बाहेती( जिल्हा उपाध्यक्ष), मा. पुंडलिक मेखले(जिल्हा उपाध्यक्ष),मा. सुनील ललवाणी(जिल्हा उपाध्यक्ष), मा. श्री. प्रतापसिंह कांचन(जिल्हा संघटक सचिव),मा. श्री. विवेक ननवरे(जिल्हा सहसचिव),मा. श्री. मनीष बलदवा (जिल्हा कार्यकारिणी सदस्य),मा. श्री. राजशेखर बारोळे(माजी जिल्हा सचिव),मा. श्री. अनिल वैद्य हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले मा.श्री. राहुल काळे(अध्यक्ष,माढा तालुका केमिस्ट असोसिएशन), मा. श्री. सुनिल कोरे(अध्यक्ष, सांगोला केमिस्ट असोसिएशन), मा. श्री. विलास कारभारी(अध्यक्ष, सोलापूर शहर केमिस्ट असोसिएशन) हे उपस्थित होते.प्रस्ताविकामध्ये माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष मा. श्री. विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले की, माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून केमिस्ट बांधव हा अकलूज मध्ये औषध खरेदीसाठी येत असतो, त्यांना विश्रांतीसाठी, त्यांच्या काही तक्रारी असतील त्या नमूद करण्यासाठी किंवा नवीन मेडिकल व्ययसाय रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांच्या हक्काचे असे ठिकाण आजपर्यंत अस्तित्वात नव्हते. ती कमतरता भरून काढण्यासाठी माळशिरस तालुक्यातील पाहिले केमिस्ट भवन उभारण्याचा निर्णय घेतला,चार महिन्यापूर्वी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना सर्व केमिस्ट बांधवांना आश्वासन दिल्याप्रमाणे केमिस्ट भवनचे उद्घाटन केले आणि मोफत एक्सपायरी बुक सर्व केमिस्ट बांधवांना देण्यात आल्या. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गिरीश एकतपुरे, सतीश चव्हाण,संतोष इंगळे, विजय सनसिंग,नितीन दोषी, आशा शेख,विजय जगताप,अभय जोशी,शुभम पवार,तुषार बेंद्रे,सुजित वाघ,मनोज जाधव,शुभम चव्हाण,रवि जगताप,शंकर पवार,प्रदीप भोरे,सुनील कोळेकर,रमजान मुलानी, तुषार जाधव, अमरसिंह गायकवाड प्रतीक शिंदे,आनंद शिंदे,संजय म्हस्के,वैभव सावंत, वैभव यादव,भरतेश वैद्य,संजय जगदाळे,अतुल जाधव,शेखर गाडेकर,अतुल आर्वे ,विशाल खंडाळके यांनी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले कार्यक्रमाची सांगता सुमधुर भोजन व ऑर्केस्ट्रा यांनी झाली.












