• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

घराच्या स्वप्नासाठी घेतलेल्या कर्जामुळे राहते घरही गेले तरीही काढलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज देणे बाकीच असल्याने आता आत्महत्या शिवाय पर्याय नाही -संतोष माने

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 25, 2023
in आपले शहर
0
घराच्या स्वप्नासाठी घेतलेल्या कर्जामुळे राहते घरही गेले तरीही काढलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज देणे बाकीच असल्याने आता आत्महत्या शिवाय पर्याय नाही -संतोष माने
0
SHARES
785
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घराच्या स्वप्नासाठी घेतलेल्या कर्जामुळे राहते घरही गेले तरीही काढलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज देणे बाकीच असल्याने आता आत्महत्या शिवाय पर्याय नाही -संतोष माने

अकलूज (प्रतिनिधी ) : घर बांधण्याचा स्वप्नापोटी पतपेढी मधून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीत सुमारे ३० लाख भरुनही सुमारे सात वर्षांपूर्वी पतपेढी ने राहते घरही जप्त करून ताब्यात घेतले. रस्त्यावर संसार उभारला मात्र पतपेढी ची पठाणी वसुली चालूच असून,दरमहा जामीनदाराकडून हफ्ते वसूल केले जात आहेत , तरीही सुमारे ५४ लाख द्या. असा तगादा पतपेढी लावत असून याबाबत माध्यमांनी तरी मला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा माझ्यापुढे आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नसल्याचे कर्जदार संतोष माने यांनी सांगितले.माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर (कृष्णप्रिया नगर )अकलूज येथील गेल्या 23वर्षापासून टेलरिंग व्यवसाय करणारे संतोष नामदेव माने व त्यांच्या पत्नी सौ.सरस्वती माने यांनी नवीन घर बांधण्यासाठी 5-8-2013रोजी शिवकृपा सहकारी पतपेढी ली. मुंबई. शाखा म्हसवड येथून द. सा. द. शे.15%व्याज दराने 14,84,000रुपये कर्ज घेतले. मुद्दल व व्याज याप्रमाणे 120महिन्यात मासिक 24000रुपये. अशी परतफेड करायची होती.

या अनुषंगाने तारण म्हणून अकलूज येथील बिनशेती गट नं -103/2.278-37चौ. मी. व प्लॉट नं 92आणि 93पैकी 139-37. चौ. मी. जागा नजर गहाणखत म्हणून लिहून दिली.त्यानंतर पूर्वी म्हसवड शाखेतून 14,84,000 कर्ज काढल्यानंतर त्यांना व्यवसायासाठी वाढीव 18,00000रुपये कर्जाची आवश्यकता होती. ते त्यांना माळशिरस शाखेतून 4-8-2014रोजी वाढीव कर्ज देण्यात आले. त्यांनी एकूण 32,84,000रुपये कर्ज काढले.सदर कर्जासाठी तारण म्हणून ही मिळकत त्यांनी नजर गहाणखत करून दिली.त्यानंतर काही वर्षे त्यांनी नियमितपणे कर्जफेड केली. काही आर्थिक अडचणीमुळे काही हफ्ते थकीत राहिले.त्यामुळे माळशिरस शाखेचे वसुली अधिकारी चांगदेव अनभुले यांनी थकीत हफ्ते भरण्यासाठी कर्जदार संतोष माने यांचेकडे तगादा लावला.व आम्ही तुमची मिळकत जप्त करणार. असे सांगितले.हा धक्का सहन न झाल्यामुळे कर्जदार संतोष माने यांचे वडील नामदेव बापू माने (वय -60वर्षे )यांना 20-8-2015 रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

दरम्यान च्या काळात स्वतःची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी मासिक 25%व्याज दराने खाजगी कर्ज काढून उपचार सुरु केले. यासाठी 10ते 11लाख रुपये खर्च झाला. त्यापाठोपाठ इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली मुलगी देखील आजारी पडली. तिच्यावर उपचार करण्यासाठी 2ते 3लाख रुपये खर्च करावे लागले.त्यानंतर 18-5-2017रोजी वसुली अधिकारी अनभुले यांनी संतोष माने व सौ. सरस्वती माने यांच्या मालमत्तेवर जप्ती आदेश नोंद करणेबाबत माळशिरस चे तहसीलदार यांना पत्र दिले. तत्पूर्वी कर्जदार यांचेवर 101अंतर्गत कोर्ट केस करण्यात आली.त्यानंतर 20-8-2018रोजी अकलूज चे मंडळ अधिकारी एच. एस. चांडोले यांनी कर्जदार यांना मिळकतीचा ताबा घेणे संदर्भात वित्तीय मालमत्तेचे संपादन व पुनर्रचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी कायदा 2002चे अंतर्गत ताबा मिळणेबाबत नोटीस दिली.13-11-2018 रोजी माळशिरस शाखेचे वसुली अधिकारी यांनी कर्जदार यांना जप्तीची नोटीस देऊन राहते घर ताब्यात घेऊन घर सील करण्यात आले.

त्यानंतर तीन दिवस अक्षरशः उघड्यावर काढले.माने हे आपले वडील, आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांचेसह उघड्यावरच राहू लागले. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्याच घरावरील छताचा आसरा घेतला. मोकळ्या जागेत पडदे लावून रहावयास सुरुवात केली.अशातच वडिलांना पुन्हा हृदयविकाराचा दुसरा झटका आला. कालांतराने 26-2-2020रोजी वडिलांचा मृत्यू झाला.माने आणि कुटूंबीय हे गेल्या सात वर्षापासून आपल्या कुटूंबा समवेत उघड्यावर राहत आहेत.

संतोष माने हे 2001पासून संतोष टेलर्स या फर्म च्या माध्यमातून टेलरिंग चा व्यवसाय करीत आहेत.दरम्यान माळशिरस शाखेचे वसुली अधिकारी यांनी 27-3-2019रोजी वर्तमान पत्रात स्थावर मिळकत जाहीर लिलाव संदर्भात नोटीस दिली. व 14-11-2018रोजी लिलाव घेतला. परंतु, या लिलावात खरेदीदार मिळाला नाही.कर्जदार संतोष माने यांनी एकूण 32,84,000रुपये कर्ज काढले असून, या कर्जासाठी त्यांचे दाजी प्रकाश मारुती तोरणे, व मित्र संदीप बाळकृष्ण कुलकर्णी हे जामीनदार आहेत.सदर कर्जापोटी कर्जदार व जामीनदार यांनी आत्तापर्यंत 29,94,925रुपये ची कर्जफेड केली आहे.कर्जदार यांनी हफ्ते न भरल्यामुळे जामीनदार यांचेकडून गेल्या सहा वर्षापासून हफ्ते वसुली केली जात आहे. दोन जामीनदार यांचे अकॉउंट मधून प्रत्येक महिन्याला एका जामीनदाराकडून 15000, व दुसऱ्या कडून 10,000रुपये अशी वसुली केली जात आहे.

तसेच कर्जदार यांची मिळकत ताब्यात घेतल्यानंतर आता दोन्ही जामीनदार यांच्या मिळकती वर ताबा मिळविण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.

घर बांधण्यासाठी कर्ज काढणे गैर आहे का ? घर बांधायचे सोडा, राहते घरही त्यांनी जप्त केले‌.आता माझ्या कर्जाच्या दुप्पट किमतीचे घर त्यांच्या ताब्यात आहे. तरी ते माझ्याकडूनच व्याजाची वसूली का करत आहेत ? मी अजून किती वर्ष कर्जाचे व्याज भरत राहायचे? का कर्जाचा व व्याजाचा फक्त रक्कम वाढवून माझे घर तसेच बळकवायचे आहे काय ?त्याचप्रमाणे संचालक मंडळाने आजपर्यंत केलेल्या करोडो रुपयांचा घोटाळा देखील लवकरच उघड करणार आहे.असे विविध प्रश्न माने यांनी उपस्थित केले आहेत.

यासंदर्भात शिवकृपा पतपेढी चे चेअरमन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
इमानदार पत्रकाराच्या संघर्षावर आधारीत “अहम” मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*

इमानदार पत्रकाराच्या संघर्षावर आधारीत "अहम" मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In