*धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २ हजार विद्यार्थांना कॅप वाटप*
अकलूज/प्रतिनीधी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकलूज परीसरासह माळेवाडी,यशवंतनगर या गावांतील जिल्हा परीषदेच्या १५ शाळेतील २ हजार विद्यार्थ्यांना उन्हाळ्याचा तडाखा बसु नये यासाठी कॅप वाटप करण्यात आल्या.धैर्यशील मोहिते-पाटील मित्र मंडळ,सिंहगर्जना मित्र मंडळ,राॉयल राईड, दयावान ग्रुप, एसबी ग्रुप,शिवरत्न व डाॅटर्स माॅम फाऊंडेशनच्यावतीने धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अकलुज परीसरातील ९ जिल्हा परीषद शाळेतील १ हजार ६१० तर यशवंतनगर परीसरातील ६ जिल्हा परीषद शाळेतील ३९० असे एकुण २ हजार विद्यार्थी मुला-मुलींना कॅपचे वाटप जि.प सदस्या शितलदेवी मोहिते पाटील,स्वरुपाराणी मोहिते पाटील,माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील,सत्यशील मोहिते-पाटील, देवश्रीदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनंजय देशमुख,क्रांतिसिंह माने पाटील,कृष्णराज माने पाटील,डाॅ.विश्वनाथ आवाड,श्रीकांत राऊत,नितीन बनकर,अनिल जाधव महेश पोरे, किरण डोंगरे, अमोल शिंदे , मनोहर एकतपुरे, विनोद थोरात, रामकृष्ण काटकर अरुऩ एकतपुरे,लालासाहेब अडगळे,पराग गायकवाड,उत्कर्ष शेटे,विशाल मोरे,राहुल फुले,रणजित भोसले,मिलिंद कोतमिरे,तनवीर तांबोळी,गणेश जामदार, शैलेश दिवटे,शिक्षण विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे, सायरा मुलाणी,केंद्र प्रमुख राजेंद्र जाधव,विठ्ठल नष्टे,वर्षा सरतापे,रामकृष्ण काटकर,नितीन थोरात, विठ्ठल काळे, समाधान वाघमारे, यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मित्र मंडळ व सिंहगर्जना मंडळ विधायक उपक्रम राबवितात. जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बेंचची सोय,कंप्युटरई- शिक्षण,डिजीटल क्लास रुम,ड्रेस वाटप,विद्यार्थीनीना सायकल वाटप असे विविध विधायक उपक्रमा बरोबरच लोकोपयोगी उपक्रम राबविले असुन यावर्षी ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर महिलांच्या ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा अयोजित करण्यात आल्या आहेत,या कुस्ती उत्फुर्तपणे प्रतिसाद द्यावा असे अवाहन मोहिते-पाटील यांनी केले.


























