जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या वतीने मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन..
दि.10 एप्रिल 2023 रोजी द्वारका हॉस्पिटल कोथरूड पुणे येथे होमिओपॅथीचे जनक डॉ.सॅम्युएल हनिमन यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या वतीने भव्य मोफत होमिओपॅथिक औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन करताना जगातील पहिले होमिओपॅथिक पीएचडी डॉ.एच.टी.घोलप सर यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड ,कोथरूड हॉस्पिटलचे डॉ.राजेंद्र मिटकरी, पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अजय तायडे, पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या महिला विभाग प्रमुख डॉ. नयना सोनवणे, पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना कोथरूड विभागाचे प्रमुख डॉ. राजकुमार अंबड ,जीपीएच्या उपाध्यक्षा डॉ.शुभदा जोशी, डॉ. गायत्री वहाळकर, डॉ.अपर्णा तायडे डॉ.नंदा गायकवाड ,डॉ.जितेंद्र वालतुरे, डॉ.दयानंद पवार , पोलिस सह निरीक्षक दीपक काळे साहेब, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय कोथरूड पुणेचे मुख्याध्यापक भारत पवार,सहशिक्षिका जावळे, सहशिक्षक काळे, जाधव,रणवीर व कृष्णा डाग्नोस्टिक सेंटर, कोथरूड पुणे इ.उपस्थित होते.
यावेळी शिबिरात हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण,हाडांची झीज तपासणी, रक्तगट,ईसीजी व होमिओपॅथिक औषधोपचार करण्यात आले.शिबिराचा 550 रूग्णांनी लाभ घेतला.











