संग्रामनगर येथे भाजपा शक्तिकेंद्र यांचे वतीने बुथ सशक्तिकरण अभियान व पदाधिकारी मेळावा संपन्न
अकलूज (प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टी संग्रामनगर शक्तीकेंद्र यांचे वतीने बुथ सशक्तिकरण अभियान व पदाधिकारी मेळावा ,भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते- पाटील व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संग्रामनगर येथे रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी संपन्न झाला.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
या समारंभास सोलापूर जिल्हा भाजपा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, सरपंच अजित रेवंडे, उपसरपंच सौ.आशा सावंत तसेच शक्तीकेंद्र प्रमुख सुरज मस्के,बुथ विस्तारक अमित पुंज, बुथ अध्यक्ष रेवंडे सर,टिळेकर,जाधव,बामणे,रोहन पवार ग्रामपंचायत चे आजी माजी सदस्य, भाजपा वेगवेगळे मोर्चा सेल अध्यक्ष, पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.







