*कॉलेज ऑफ फार्मसी,अकलूजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा.*
संग्रामनगर दि.१३ (संजय लोहकरे यांजकडून)
ती आई आहे…ती ताई आहे…ती मैत्रीण आहे…ती पत्नी आहे…ती मुलगी आहे…ती माया आहे…तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे…! कॉलेज ऑफ फार्मसी अकलूजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी व महिला उद्योजक कु.बहार खान या कार्यक्रमास उपस्थित होत्या. यानंतर कार्यक्रमाच्या कु.बहार खान यांचा सत्कार प्रा.प्रशाली शिंदे यांनी केला.त्यानंतर महिला दिना निमित्त सर्व महिला प्राध्यापिकांचा व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील कु.कोमल शिंदे (अंतिम वर्ष बी.फार्मसी), कु.समृध्दी क्षीरसागर (तृतीय वर्ष बी.फार्मसी),आर्यन घाडगे (प्रथम वर्ष बी.फार्मसी) यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि युवा उद्याजिका कसे घडायचे आणि आपला महिला उद्योजक घडण्याचा प्रवास सर्व विद्यार्थ्यांना सांगितला.तसेच अडचणीच्या काळात समस्यांना कशा प्रकारे तोंड देऊन आपणच आपल्या ध्येयाचा कसा करायचा पाठलाग करायचा हे देखील सांगितले. तसेच महाविद्यालयातील प्रा.डॉ.मुकुंद गाडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.प्रशाली शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी ताटे आणि कु.ऋतूजा साठे यांनी केले.तर आभार प्रदर्शन कु.प्रतिक्षा राजगुरू (अंतिम वर्ष बी.फार्मसी) यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.ऐश्वर्या फुटाणे यांचे मार्गदर्शन लाभले.







