दिनांक 8 मार्च 2023 जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाहूरवस्ती केंद्र सदाशिव नगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या शाळेच्या वतीने महिला दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थी भाषणे शिक्षक भाषणे महिला प्रतिनिधी भाषणे यांचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत भांबुर्डी गावचे माजी सरपंच सौ. वाघमोडे ताई शाळा व्यवस्थापन समिती सदस्या माता भगिनी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भगत सर तर आभार प्रदर्शन श्री ननवरे सर घाडगे सर यांनी मानून कार्यक्रम संपन्न झाला.






