पाटील वस्ती येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित, कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती ता. माळशिरस येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर व महिला शिक्षिका तसेच विविध वेशभूषेमध्ये आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंचावरील सर्व महिला शिक्षकांचा गुलाब पुष्प व पेन देऊन प्रशालेच्या विद्यार्थिनींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता गवसणे व कु. मधुरा राक्षे यांनी महिला दिनानिमित्त भाषण केले तसेच प्रशालेचे ग्रंथपाल श्री. सुनील कुलकर्णी सर यांनी आपल्या शिक्षकीय भाषणात जागतिक महिला दिन का साजरा केला जातो तसेच विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेतलेल्या महिलांची उदाहरणे देत त्यांनी देश पातळी व गाव पातळी तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी घेतलेली उंच भरारी याचाही उल्लेख करत विद्यार्थिनी व महिला कशा पद्धतीने विविध स्तरात गरुड भरारी घेत आहेत तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान केला. व सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर यांनी ही सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनी यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सौ. मोरे मॅडम यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना उद्देशून आपल्या आईच्या कार्याचा नेहमीच गौरव करा तिच्या कामाचा नेहमीच चांगला उल्लेख करा व तिला तिच्या कामांमध्ये मदत करा कारण तिच्यामुळेच आपण घडतो आहोत असेही सांगितले. तसेच त्यांनी या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर हे आपल्या कवितेतून गाऊन दाखवले. या महिला दिनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयातील विद्यार्थिनी विविध कर्तुत्ववान महिलांच्या पोषाखामध्ये आलेल्या होत्या. त्यामध्ये राजमाता जिजाऊ, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, इन्स्पेक्टर, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराराणी, सिंधुताई सपकाळ, कोळीण अशा विविध पोषाखामध्ये विद्यार्थिनींनी प्रतिकृती सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनात प्रशालेचे सहशिक्षक श्री. संतोष अनगळ सर यांनी कर्तुत्ववान महिलांचा व प्रशालेतील साहशिक्षिका भगिनींचा “क्षण तुमच्या गौरवाचा, तोरणे ही सजली, जागरण करण्या स्त्री शक्तीचा, सृष्टीही बहरली”, अशा शब्दात उल्लेख केला. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेतील सौ. मोरे मॅडम, देशमुख मॅडम, गायकवाड मॅडम, चेमटे मॅडम, चिंतामणी मॅडम, पठाण मॅडम, जाधव मॅडम, मदने मॅडम, डांगे मावशी उपस्थित होत्या. तसेच सदर कार्यक्रमासाठी प्रशालेतील सहशिक्षक श्री दगडे सर, श्री शेटे सर, श्री ढोले सर, श्री कुलकर्णी सर, श्री अनगळ सर, श्री गुरव सर, श्री. संतोष मुटकुळे यांचे सहकार्य लाभले.






