*अकलूज येथे जेष्ठ नागरिक संघाचा १८वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा.*
संग्रामनगर २३ (केदार लोहकरे यांजकडून)माळशिरस तालुका जेष्ठ नागरिक संघाचा १८ वा वर्धापनदिन व सुभाषचंद्र बोस यांची जयंती अकलूजच्या रूपा इन्फेक्ट हाॅल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या जेष्ठ नागरिक संघाची स्थापना २३ जानेवारी २००५ साली करण्यात आली होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदकुमार दोशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद फडे व फत्तेसिंह माने पाटील उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात थोर स्वतंत्रसेनानी सुभाषचंद्र बोस व सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्या नंतर जेष्ठा नागरिकांचे स्वागत जेष्ठ नागरिक संघटनेच्या उपाध्यक्ष सौ.नयना शहा यांनी केले.तसेच चालू वर्षात संघटनेतील निधन झालेल्या सभासदांना श्रध्दांजली वहाण्यात आली. यावेळी पुणे विभागीय फेस्कोमचे सचिव हणमंत कुंभार यांनी अकलूजच्या जेष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे कौतुक करून गेली १८ वर्षात संघाच्या वतीने विविध उपक्रम राबवून नावलौकिक मिळविला आहे.तसेच पुर्वीच्या सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या सवलती बंद केलेल्या आहेत त्या पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी केली. या कार्यक्रमात मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मालकंस पुणे व जेष्ठ नागरिक संघ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने ” सौ साल पहले,मेरा प्यार भी तू है ” हिंदी व मराठी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये गायक मोहनकुमार गोयल,कल्पना कुलकर्णी, अजितकुमार देशपांडे व नंदकिशोर भोसले यांनी १९६० ते १९८० दशकातील बहारदार गाणी सादर करून जेष्ठ नागरिक त्यांच्या गाण्यांच्या तालावर नृत्य करत होते.जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य काशिनाथ डांगे गुरूजी (वय ९४) डि.पी.पवार सर (वय ७८) शांतीभाई शहा (वय ७०)यांनी तर तरूण्यातील नृत्य करून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात करून त्यांच्या नृत्याला प्रोत्साहन दिले.








