*आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून अकलूज नगरपरिषदेसाठी 3 कोटी 71 लाखांचा निधी मंजुर*
नागरिकांनी मानले आभार
अकलूज : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे अकलूज नगरपरिषद हद्दीतील 12 विकासकामांसाठी तब्बल 3 कोटी 71 लाखांचा निधी मंजुर झाला आहे.नागरी वस्ती वस्ती सुधार योजनेच्या अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणार्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेमधून अकलूज नगरपरीषदेसाठी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याचे पत्र नुकतेच अकलूज नगरपरिषदेस प्राप्त झाले असून या अंतर्गत 3 कोटी 71 लाख दोन हजार सहाशे सत्तर रूपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत.यामध्ये जिल्हा परिषद 21 खोल्या शाळा पाठीमार्ग अंतर्गत रस्ता डांबरीकरण व काँक्रीट गटर बांधकाम करणेसाठी 77 लाख 28 हजार 532 रू. व्यंकटराव माने पाटी नगर येथे अंतर्गत काँक्रीट गटर बांधकाम करणेसाठी 27 लाख 45 हजार 672 रू, रमामाता चौक ते दिपक खंडागळे यांचे घरापर्यंत काँक्रीट रस्ता व गटर बांधकाम करणे साठी 22 लाख 32हजार 515 रू, महर्षि कॉलनी/इंदिरानगर येथे काँक्रीट गटर बांधकाम करणे साठी 46 लाख 75 हजार 918 रू, महर्षि कॉलनी इंदिरानगर येथे महिला व पुरूषांसाठी सार्वजनिक शौचालय बांधकाम करणेसाठी 21 लाख 12 हजार रूपये, बॅकवर्ड हौंसिंग सोसायटी येथे महिला व पुरूषांसाठी सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे साठी 15 लाख 9 हजार रू. कदम हॉस्पीटल ते जुना सांगोला रोड येथे काँक्रीट रस्ता करणेसाठी 21 लाख 34 हजार 938 रू. व्हेज स्ट्रीट हॉटेल ते जुना सांगोला रोड रस्ता डांबरीकरण करणे साठी 11 लाख 32 हजार 480 रू. रामबाग वसाहत ते समतानगर काँक्रीटगटर बांधकाम करणे साठी 14 लाख 26 हजार 516 रू. डवरे प्लॉट अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणेसाठी 40 लाख 23 हजार 598 रू., अकलाईनगर रस्ता ते मेजर गायकवाड रस्ता डांबरीकरण करणेसाठी 20 लाख 25 हजार 517 रू., अकलूज टेंभुर्णी रस्ता ते दिलीप ऑटो व अकलूज टेंभुर्णी रस्ता ते केजीएन बिल्डींग शॉप (औद्योगिक वसाहत) रस्ता डांबरीकरण करणेसाठी 53 लाख 55 हजार 655 रू असा एकुण तीन कोटी 71 लाख दोन हजार सहाशे सत्तर रूपयांचा निधी मंजुर झाला असल्याचे पत्र अकलूज नगरपरिषदेस प्राप्त झाले आहे.मंजुर कामांमुळे अकलूज परिसरातील रस्ते व गटारींचे प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरीकांकडून समाधान व्यक्त होत असतानाच आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे आभार मानण्यात येत आहेत.






