राऊतनगर (अकलूज )येथील तिघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
अकलूज ता. २३: जातिवाचक शिवीगाळ देऊन मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दीलेल्या माहितीनुसार, राऊतनगर-अकलूज येथील रहिवासी राजू संजय अडगळे वय 22 यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे शेजारी राहणारे विकी मुंजाळ हे त्यांच्या लहान मुलांना अडगळे यांच्या घरासमोर बाथरूम करीता बसवतात तसेच कचरा टाकतात याबाबत समजावून सांगून सुद्धा गुरुवार (ता.22) रोजी सुमन मुंजाळ यांनी आमची मुले तुमच्या घरासमोर बाथरूमला बसली असताना तुम्ही मुलांना का खवळता असे म्हणत तक्रारदाराच्या आजी शालन नारायण अडगळे यांच्या तोंडात हाताने चापटा मारल्या यावेळी तक्रारदार सोडविण्यासाठी गेले असता सुमन मुंजाळ यांनी आपला मुलगा विकी यास बोलावून घेतले. विकि याने जातीवाचक शिव्या देत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करू लागला यावेळी तक्रारदाराने आरडाओरडा केल्याने त्यांचे आजी शालन अडगळे व आजोबा नारायण अडगळे सोडविण्यासाठी आले तेव्हा त्यांनाही मध्ये पडू नका म्हणत जातीवाचक शिवीगाळी करीत घराकडे निघून गेला व थोड्यावेळाने विकी व आकाश याने परत येऊन घराकडे दगड फेकले व जातीवाचक शीवीगाळ व दमदाटी केली अशा प्रकारची तक्रार सुमन अदिकराव मुंजाळ, विकी अदिक राव मुंजाळ व आकाश आदिकराव मुंजाळ यांच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात दिल्याने त्यांच्यावर गु. र. नंबर 0754/ 22 ने भारतीय दंड संहिता 1860 कलम 323, 504 506, 34 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या 3(2)(va), 3(1) (s) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे हे करीत आहेत






