*अकलूज महावितरण विभाग अकलूज येथे ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करावा अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर यांची मागणी*
अकलूज (प्रतिनिधी )अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे वतीने २४ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा होत आहे. या निमित्ताने शुभेच्छा फलकाचे अनावरण केले.तसेच महावितरण तर्फे विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या बुधवारी “ग्राहक तक्रार निवारण दिन” आयोजित करावा.अशी मागणी करण्यात आली. त्यामध्ये ग्राहकांच्या समस्या, अडचणी, तक्रारी, प्रश्न ऐकून त्यांचे प्राधान्याने निवारण करण्यात यावे. यावेळी आपल्या विभागातील सर्व सहाय्यक अभियंते व त्यावरील अधिकारी उपस्थित असावेत असे आदेश आहेत. त्याप्रमाणे हा दिन सुरू होता.तथापी कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून हा तक्रार निवारण दिन होत नाही. सध्या सर्व व्यवहार सुरळीत चालू झालेले आहेत. तक्रार निवारण दिन सुरू नसल्याने ग्राहकांच्या तक्रारीत वाढ होत असल्याचे जाणवते. तरी विनंती की, या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करुन त्याची वेळ व ठिकाण वृत्तपत्रातून पूर्वप्रसिद्ध करावे. तसेच ग्राहक पंचायतीचे सदस्यांना निमंत्रित करण्यात यावे. कार्यवाही व्हावी यासाठी .२१ डिसेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर अध्यक्ष लालासाहेब अडगळे यांनी महावितरण विभाग अकलूज यांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देऊन विनंती केली. यावेळी महावितरण विभागचे अधिकारी दत्तात्रय ओमासे स्वप्नील लोंढे,क्रांतिसिंह माने-पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य (अकलूज ग्रामपंचायत),राजेंद्र माने, इनुस नदाफ, अकलूज शहर ग्राहक पंचायत अध्यक्ष लालासाहेब अडगळे व अकलूज शहर ग्राहक पंचायत समन्वयक अमित पुंज उपस्थित होते.







