माळशिरस येथे 58 फाटा खंडोबावस्ती येथे खंडोबा मंदिरात नवीन मूर्तीची स्थापना.पहिली मूर्ती मात्र भर उन्हात.भक्तांच्या भावना दुखावल्या.
अकलुज.(प्रतिनिधी )माळशिरस येथील जय मल्हार तरुण मंडळ खंडोबा वस्ती(58फाटा )यांनी माळशिरस नगरपंचायत चे नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख व माळशिरस पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडोबा यात्रा भरवली होती. खंडोबा वस्ती येथील खंडोबा हा संपूर्ण माळशिरस गावचा खंडोबा आहे. माळशिरस गावामध्ये एकमेव खंडोबाचे मंदिर आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला माळशिरस मधून खंडोबा यात्रेसाठी मोठ्या संख्येने भावीक भक्त येतात. मागील दोन वर्ष कोरोनामुळे ही यात्रा साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.परंतु यावर्षी ही यात्रा भव्य स्वरूपात करण्यात आली होती.या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.सदर यात्रेसाठी जेजुरी वरून ज्योत आणण्यात आली.सदर यात्रा झाल्यानंतर चार डिसेंबर रोजी एकादशी दिवशी काही लोकांनी मंदिरातील मूर्ती काढून त्या ठिकाणी नवीन मूर्तीची स्थापना केली आहे व पहिली मूर्ती मागील बाजूस झाडाखाली उन्हात ठेवण्यात आली आहे. एकादशी ला मंदिरात नारळ सुध्दा फोडला जात नाही.तसेच मंदिरातील देव मागे जात नसतो तसाच तो उन्हात ठेवला आहे. खूप पूर्वीची खंडोबाची मूर्ती संपूर्ण माळशिरस गावाला पावणारी होती. त्यामुळे तो देव परत देवळात आणावा असे लोकांमधून चर्चा होत आहे तसेच भक्तांच्या भावनाही त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. काही लोकांनी मनाने असे कृत्य केलेले गावातील इतर ग्रामस्थांना मान्य नाही. तरी पुढील चंपाषष्टीला या मूर्तीची पुन्हा स्थापना करण्यात येणार असल्याचे युवाउद्योजक सुमित भाऊ जानकर यांनी सांगितले आहे..






