रत्नाई कृषी महाविद्यालया तर्फे चौंडेश्वरवाडी येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन
अकलूज/ प्रतिनिधी;शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत चौंडेश्वरवाडी येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील , रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे,प्रा. एस . एम. एकतपुरे, व कार्यक्रम अधिकारी प्रा. एच. एस.खराडे यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीकन्या कु.स्नेहल शिंदे ,पूजा घाडगे ,अपेक्षा धापटे,प्राची जाधव ,प्रगती सालगुडे,कोमल देवकते, काजल वळकुंडे,रोहिणी कांबळे यांनी चौंडेश्वरवाडी येथील शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी सर्व कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .या प्रसंगी चौंडेश्वरवाडी चे सरपंच संजय कडाळे,उपसरपंच राणी साखळकर ,ग्रामसेवक अशोक सावंत तसेच धीरज माने देशमुख ,बाळासाहेब दत्तात्रय माने देशमुख,गावचे पोलिस पाटील हनुमंतराव माने देशमुख, माजी उपसरपंच दत्तात्रय माने देशमुख,मुहम्मद पठाण , पशुसंवर्धन अधिकारी हनुमंत काळे,संदीप देशमुख , जोतिराम गोडसे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.






