*संग्रामनगर येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न.* संग्रामनगर दि.१४ (केदार लोहकरे याजकडून)संग्रामनगर-अकलूज येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय अकलूज शाखेच्या वतीने 75 वा आझादी अमृतमहोत्सव आज मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात सामाजिक बांधिलकी जपून साजरा करण्यात आला.अकलूज सेंटर संचालिका शिवराञी दिदी यांनी राष्ट्रध्वज फडकविला आणि भारत माता की जय,वंदे मातरम् च्या आदी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा देत स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला संपूर्ण भारतातील नागरिक भारतीय स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात दिवस साजरा करण्यात येत असून प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय अकलूज शाखेच्या वतीने ही ईश्वरी परिवाराने सकाळी ध्वजारोहण करून भारताच्या तिरंगी ध्वजाला वंदन करून राष्ट्रगीत म्हणण्यात आहे.आज ईश्वरी विश्व विद्यालय देश भक्तीने फुलून गेला होता. यावेळी सर्व ब्रह्माकुमारीज परिवार अकलूज परिसरातील संग्रामनगर,सराटी,बोंडले,माळेवाडी,वेळापुर, खुडूस येथील ईश्वरी परिवार उपस्थित होता.






