अकलूज (प्रतिनिधी )दिनांक-04/08/2022 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर (महाराष्ट्र शासन अंगीकृत) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस स्थापित *लोकायत लोकसंचलीत साधन केंद्र अकलुज कार्यालयाची**5*वी वार्षिक सर्वसाधारण सभा*नगरपरिषद हॉल अकलुज येथे पार पडली.सदर सभेस शितलदेवी मोहिते पाटील, डॉटर मॉम्स फौंडेशन अध्यक्षा , महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूरचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मा.श्री. सतीश भारती सर ,तालुका कार्यक्रम व्यवस्थापक मा.श्री.रणजित शेंडे सर बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी मा.श्री. संतोष सोनवणे सर तसेच बॅक ऑफ बडोदा चे मा.श्री.जनार्धन निजसुरे सर लोकायत CLF अकलुज अध्यक्ष प्रतिभा गायकवाड मॅडम सर्व कार्यकारणी ,तसेच सर्व स्टाफ उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून व प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे यांचे लोकायत CLF च्या सर्व कार्यकारणी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक लोकायत CLF चे व्यवस्थापक कामिनी ताटे देशमुख यांनी केले. त्यानंतर लोकायत लोकसंचलिक साधन केंद्र अकलुज चा सन 2021-22चा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं व या अहवालाचे वाचन लोकायत चे अध्यक्ष प्रतिभा गायकवाड यांनी केले त्यानंतर लोकायत CLF अंतर्गत गावातील उत्कृष्ट गटांना पारितोषिक देण्यात आली व लोकायत CLFमधील सर्व कर्मचारी यांना कोरोना काळात उत्कृष्ट कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दुर्गा ब्युटी पार्लर कोर्स प्रमाणपत्र वाटप करण्यात आली ..व सर्वात जास्त कर्ज पुरवठा करण्यात आलेल्या गटाना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले .तसेच उपस्थित मान्यवरांनी भाषण केले. डॉट्स मॉम फाऊंडेशन अध्याक्ष मा .सौ शितलदेवी मोहिते पाटील (वहिनीसाहेब ) यानी महिलाना स्वताच्या आरोग्याची काळजी घेऊन रोज स्वतःसाठी एक तास वेळे काढला पाहिजे तसेच हर घर झेंडा लावला पाहिजे याबाबत उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले मा.श्री.रणजित शेंडे सरानी माविम व सीएमआरसी कामकाजाची माहिती दिली. तसेच सतिश भारती सरानी वेगवेळया ऑक्टीविटी बाबत महिलाना माहिती व मार्गदर्शन केले दिली, तसेच BOBचे जनार्दन निजसुरे सर यांनी महिलांनी जास्तीत कर्जं घेऊन उद्योजक झाले पाहिजे हे सांगितले.त्यानंतर BOI चे संतोष सोनवने सरांनी गटाना कर्ज वाटप व व्याजदर बाबत महिलाना माहिती सागितली .तसेच NPSचे रमेश जाधव सरानी राष्ट्रीय पेन्शन बाबत महिलांना माहिती सांगितली तसेच CRP गाधी मॅडम यानी एक छोटीसी एकाकीका सादर केली . व crpसाळुंखे यानी मनोगत व्यक्त केले ..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली राऊत मॅडम यांनी केले .कार्यक्रमाचे आभार CLF अध्यक्ष यांनी केले व समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी CLF कार्यकारिणी, CLF लेखापाल, क्षेत्रसमन्वयक, ग्रामसंस्था लेखापाल, सीआरपी यांनी प्रयत्न केले…
















