द्वारकाधिश सेवाभावी संस्थेमार्फत अन्नदान व मोफत आरोग्य शिबिराचे* आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )संतशिरोमणी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिम्मित अकलूज नगरी मध्ये आलेल्या काही दिंड्यातील वारकरी बंधूंना सालाबादप्रमाणे या वर्षीही मदत न्हवे कर्तव्य या भावनेतून *द्वारकाधिश सेवाभावी संस्थेमार्फत अन्नदान व मोफत आरोग्य शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी द्वारकाधिश सेवाभावी संस्थेचे सदस्य डॉ हर्षवर्धन गायकवाड, डॉ प्रफुल्ल गायकवाड, डॉ प्रियांका गायकवाड, अमरसिंह गायकवाड, विठ्ठल गायकवाड, ऋषिकेश गायकवाड,शंभूराजे गायकवाड व इतर सदस्य उपस्थित होते.









