*अकलूज नगरपरिषदीकडे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे निवेदन*
*निरा नदीकाठी स्मशानभूमी जवळचा कचरा डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्याची मागणी*
अकलाई नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांनी आमच्या सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाकडे लखी तक्रारी अर्जं त्दिला असून त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आला आहे की अकलुज नगर परिषद हद्दीतील असलेले कचरा डंपिंग ग्राउंड लोकवस्तीच्या जवळ असल्याने येथील रहिवाशांना घर सोडून जाण्याची वेळ आली आहे कचरा पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये बायो मेडिकल वेस्ट डॉक्टर लोकांनी टाकून दिलेले इंजेक्शन सलाईन नळ्या औषधयाच्या बाटल्या सर्व जुळुन जीव घेणे विषाणू वायू धुर मानवी वसाहतीत पसरून तिथे राहणाऱ्या नागरिकांची आरोग्य स्थिती बिघडत चालली असल्याने अनेक आरोग्याच्या त्रासाला समोर जावे लागत आहेतरी तिथे असलेल्या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड आपण एक महिन्यात दुसरीकडे हलवून तो परिसरास पूर्ण स्वच्छ करून घ्यावे व नागरिकांना प्रदूषण मुक्त एक चागले आरोग्य द्यावे व बायो मेडिकल वेस्ट निष्काळजीपणाने कोणते हॉस्पिटल टाकते त्याची कसून चौकशी करून आशा हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात यावा व नवीन कचरा डम्पिंग ग्राउंड वरती सीसीटीव्ही लावण्यात यावी जेणेकरून बायो मेडिकल वेस्ट टाकणारे सीसीटीव्हीत कैद होऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल तरी महोदय वरील विषय हा मानवी जिवाला धोकादायक ठरत असून अकलूज नगरपरिषदेला निवेदन दिलेल्या सापासून तिथे राहणाऱ्या रहिवाशांची विषाणू वायू धुराने आरोग्य तिथे बिघडून व दम्याचा त्रासाने मानवी जीवनाची जीवित हानी झाल्यास सर्वस्व जबाबदारी ही आरोग्य विभागाची राहेल निवेदन अकलूज नगरपरिषदीचे O S सुनील काशीद यांनी स्वीकारले.*वरील मागणी केल्याप्रमाणे एक महिन्यात प्रश्न न मार्गी लावल्यास आपल्या कार्यालयापुढे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.*यावेळी पश्चिम भारत अध्यक्षअमोल बाळासाहेब माने पांचाळ सोनार समाज महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश भास्करे उपस्थित होते.






