अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा खेळी मेळीत
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज कृषि उत्पन्न बाजार समिती मासिक मिटींग दिनांक १८/०८/२०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता खेळीमेळीत संपन्न झाली. बाजार समितीच्या विषय पत्रिकेवरील सर्वच विषय सर्व संचालक मंडळाच्या संमतीने मंजूर करणेत आले. बाजार समितीचे संचालक मंडळ सभा, दिनांक ३०/०६/२०२३ रोजी विषय क्र. ६ अन्वये बायपास रोडवरील घोडे बाजारात बांधलेल्या सु.मा.गाळ्यांचा लिलाव बांधकाम उपसमितीच्या सभेमध्ये वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देऊन करणेचे सर्व संचालक मंडळाने ठरविले त्यास अनुसरून दिनांक १२/०७/२०२३ रोजी दैनिक दिव्य मराठी वर्तमान पत्रात ठळकपणे जाहिरात देण्यात आली होती. जाहिर सुचनेव्दारे कृषि पुरक व्यवसाय करणारे संबंधीत घटकांना कळविणेत आले होते. सु.मा.गाळे १२ वा लिलाव अनामत डिपॉझिट घेऊन जाहिरात प्रसिध्द झालेपासून ७ दिवसांत लेखी अर्ज स्वारस्याची अभिव्यक्ती व लिलावामध्ये भाग घेणेकरिता अनामत रक्कम रू. १००००/- जमा करावी. त्या संबंधीत अटी व शर्ती बाजार समितीच्या प्रसिध्दी बोर्डावर डकवण्यात आल्या होत्या. विहीत कालावधीत लिलाव प्रक्रीयेमध्ये भाग घेणेकरीता अनामत रक्कम भरली अशा सर्व इच्छुक गाळेधारकास बाजार समितीने जाहिर लिलाव प्रक्रीयेमध्ये बांधकाम उपसमिती समावेत समाविष्ट करणेत आले होते. त्यास अनुसरून दिनांक १९/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता बाजार समितीच्या मुख्यालयात सु.मा. गाळा लिलाव प्रक्रीया बाजार समितीचे नियम व अटीस अधिन राहून पार पडली. लिलाव प्रक्रीया सुरू करते वेळी बाजार समितीचे सभापती, बांधकाम उपसमितीचे सदस्य व स्वारस्याचे अभिव्यक्ती (इच्छुक गाळाधारक) यांचे प्रोसिडींग बुकवरती स्वाक्षरी घेऊन सु.मा.गाळे लिलाव संबंधीचे नियम व अटी वाचून दाखवून व त्याच्या प्रती सर्व इच्छुक गाळाधारकास देऊन लिलाव प्रक्रिया सुरू करणेत आली.सु.मा.गाळ्याची लिलाव प्रक्रिया क्रमशः १ ते १२ करण्यात आली. बाजार समितीची रु.६,००,०००/- बोली ठेवली होती. लिलाव प्रक्रियेमध्ये रू. ६,४०,०००/- पासून रु. १०,००,०००/- पर्यंत गाळ्याचे लिलाव झाले. लिलाव प्रक्रिया सर्व समक्ष पारदर्शपणे व आक्षेपाविना पार पडली असे असतानासुध्दा बाजार समितीचे संचालक श्री. उत्तम शिवदास जानकर रा. वेळापूर यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यास सभेमध्ये बाजार समिती संचालक श्री. बाबाराजे देशमुख, श्री. बाळासो देशमुख, श्री. लक्ष्मण पवार, श्री. संदीप पाटील, श्री. नितीन सावंत, यांनी नियमानुसार व अतिशय आत्मविश्वासपूर्वक उत्तरे दिली. बाजार समितीचे सु. मा. गाळे १२ बांधकाम खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या डी.एस.आर नुसार झालेला आहे. त्यास मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी मंजूरी दिली आहे. बाजार समितीचा कारभार नियमानुसार होत असून सु. मा. गाळ्याच्या बांधकामामध्ये कोणताही अपहार झालेला नाही. सु.मा.गाळा बांधकामाचे ई-टेडर झालेले होते. त्यामुळे बांधकामामध्ये भ्रष्ट्राचार झाला असल्याचा आरोप बिनबुडाचा व कल्पोकल्पीत आहे. बाजार समिती कोणत्याही गाळ्यासाठी जागा विक्री करीत नाही. बाजार समिती गाळा अथवा गाळ्यासाठी देण्यात आलेल्या जागा भाडे कराराने देत असते सु. मा. गाळ्यांच्या डिपॉझिटच्या जमा पावत्या गाळेधारकांस दिल्या जातात. त्या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम कोणालाही दिली जात नाही किंवा घेतली जात नाही.कृषि उत्पन्न बाजार समितीचे स्थापनेपासून बाजार समितीचा कारभार पारदर्शक व उल्लेखनिय आहे. बाजार समिती मा. श्री. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शनाखाली उत्तरोत्तर प्रगती पथावर आहे. गतवर्षी स्मार्ट योजने अंर्तगत पुणे विभागात दुसरा व सोलापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळालेला आहे. बाजार समितीचा कारभार अतिशय चांगला असताना बाजार समितीचे संचालक श्री. उत्तम शिवदास जानकर रा, वेळापूर यांनी सोशल मिडीयाकडे चुकीची माहिती देवून बाजार समितीची जाणिवपूर्वक बदनामी करीत आहेत. वास्तविक पाहता बाजार समिती संचालकांनी शेतकरी व बाजार समितीचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार केला पाहिजे. परंतु श्री. उत्तमराव जानकर यांचेकडून तसे न होता राजकीय स्टंटबाजी करून चुकीच्या माहितीच्या आधारे बाजार समितीची बदनामी करून संभ्रम निर्माण करीत आहेत. येथून पुढे चुकीच्या माहितीच्या आधारे सोशल मिडीया, प्रिंट मिडीयाच्या माध्यमातून बाजार समितीची asarat केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल यांची त्यांनी दक्षता घ्यावी. शेतकरी व तत्सम घटकांचा मोहिते-पाटील परिवारावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि मोहिते-पाटील परिवाराने हा विश्वास सार्थ ठरविलेला आहे. अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती श्री. बापूराव (मामासाहेब) पांढरे, बाजार समितीचे संचालक श्री. बाळासाहेब देशमुख, श्री. लक्ष्मण पवार, श्री. संदीप पाटील, श्री. नितीन सावंत यांनी दिली.






